पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन: 'कोरोना'च्या बळींचा आकडा ४९० वर, २४ हजार लोकांना विषाणूची लागण

चीनमध्ये 'कोरोना'ची दहशत कमी होण्याची चिन्हे दिसत नाही

कोरोना विषाणुच्या विळख्यात अडकलेल्या चीनमध्ये मृत्यूचं तांडव थांबण्याचे चित्र दिसत नाही. चीनमध्ये कोरोनाच्या बळींचा आकडा आता ४९० वर पोहचला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. चीनच्या वुहानमधून पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण आहे. चीनमध्ये तब्बल २४ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वृत्त एएफसी वृत्तसंस्थेने दिले आहे.

कोरोना झालेल्या वृद्ध जोडप्याच्या भावनिक व्हिडिओ व्हायरल

दरम्यान चीनवर ओढावलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी धारण केलेल्या मौनावर धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. वुहान येथील एका डॉक्टरने कोरोना या विषाणूसंदर्भातील माहिती  डिसेंबरमध्येच दिली होती.याकडे दुर्लक्ष केल्याने चीनवर मोठी आपत्ती आली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीवघेण्या विषाणूचा वेगाने होणाऱ्या प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये युद्धपातळीवर हालचाली सुरु आहेत.  

चिनी महिलेचा भारतात विवाह, कोरोनाच्या भीतीनं वधू पक्षाची डॉक्टरांकडून तपासणी

चीनच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्यामध्ये दोन तृतियंश पुरुष आहेत. मृत्यांमध्ये ८०  टक्के लोक ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्याची माहिती देखील मंत्रालयाने दिली होती. यातील ७५ टक्के लोक हे ह्रदय विकाराचा त्रास मधुमेह, ट्यूमर यासारख्या व्याधींनी ग्रस्त होते.