पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनगणना आणि NPR ची प्रक्रिया स्थगित

सरकारने जनगणनेची प्रक्रिया केली स्थगित

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने जनगणना २०२१ चा पहिला टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची (NPR) प्रक्रिया स्थगित केली आहे.

कोविड-19 : कोहली ब्रिगेडला दिलाय असा इनडोअर टास्क!

गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूमुळे देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता जनगणना २०२१ आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (NPR)काम स्थगित करण्यात आले आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान ही प्रक्रिया होणार होती. मात्र आता पुढील आदेश मिळेपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयाला चिदंबरम यांचा पाठिंबा, ट्विट करून दिल्या सूचना

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार असल्याचे सरकारने सांगितले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये आतापर्यंत ५६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus the first phase of census 2021 and the updation of npr postponed until further orders