पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्वारंटाइनमध्येही लोक ऐकायला तयार नाहीत, हॉस्पिटलमध्ये नमाज पठण सुरु

काही रुग्णांनी तिथेच एकत्र येत नमाज अदा केली.

देशात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. तेलंगणातही अशीच काहीशी स्थिती आहे. परंतु, येथे क्वारंटाइन करण्यात आलेल्या मुस्लिम समाजातील लोकांकडून रुग्णालयातच नमाज अदा करण्यात येत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण हैदराबादमधील गांधी रुग्णालयातील आहे. या रुग्णालयात काही कोरोना संशयित मुस्लिम युवकांचे क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील काही रुग्णांनी तिथेच एकत्र येत नमाज अदा केली. विशेष म्हणजे सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण, नागरिकांकडून याला हरताळ फासला जात आहे. 

कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलमध्ये आत्महत्या

दरम्यान, हैदराबादमधील गांधी सरकारी रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झालेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. रुग्णालयाचे अधिक्षक श्रवण कुमार म्हणाले की, मृत व्यक्तीने दिल्लीचा प्रवास केला होता. त्याला पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर कोरोना विषाणूचे उपचार सुरु होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तैनात डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांनी नंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवली. 

अरूणाचल प्रदेशच्या सीएमचा दावा; १५ एप्रिलला लॉकडाऊन संपेल, पण...

देशभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात आतापर्यंत कोरोना पीडित लोकांची संख्या ही १९६६ पर्यंत पोहोचली. यामध्ये १७६४ या आजाराशी झगडत आहेत. तर १५० लोकांना रुग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. या आजारामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या ५० वर पोहोचली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Telangana People who are under quarantine at Gandhi Hospital in Hyderabad offer namaaz