पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा आता युरोपमध्ये वेगाने फैलाव, इटलीमध्ये चिंतेची स्थिती

कोरोना विषाणू

चीनमध्ये भीषण रूप घेतलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव आता युरोपियन देशांमध्येही होऊ लागला आहे. इटली, फ्रान्समध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा आणखी प्रसार होऊ नये म्हणून फ्रान्समधील लूव्हर संग्रहालय रविवारी बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या ६० पेक्षा जास्त झाली असून, आतापर्यंत या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या जगभरात ३००० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.

'दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्त्वासाठी लढत होती'

चीनमधील हुवेई प्रांतातील वुहानमध्ये कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याच प्रांतात सर्वाधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण आता कोरोनाचा फैलाव इतरही देशांमध्ये होऊ लागल्याचे दिसून येत आहे. जगभरात सध्या ८८००० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जगाच्या नकाशावरील सर्वच खंडामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

रविवारी कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची ही या देशातील पहिलीच घटना आहे. इटलीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत २४ तासांत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इटलीमध्ये १६९४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. इटलीमध्ये आतापर्यंत ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत १३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रविवारी एका दिवसांत ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ जणांना चिरडले

इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अमेरिकी प्रशासनाने आपल्या नागरिकांना इटलीच्या काही शहरांमध्ये न जाण्याची सूचना दिली आहे. अमेरिकेतील प्रमुख विमान कंपन्यांनी मिलानला जाणारी विमाने पुढील काही दिवसांसाठी तात्पुरती बंद केली आहेत.