पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनच्या निर्णयाचे सोनिया गांधींकडून स्वागत, काही सूचनाही केल्या

सोनिया गांधी

कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्रीपासून देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर त्यांनी या लढ्यासाठी डॉक्टरांना, नर्स, आरोग्यसेविकांना आवश्यक त्या सर्व वस्तू पुरविण्याची मागणीही केली आहे. 

सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानदाराचा 'केरळ पॅटर्न', भन्नाट आयडिया

सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. पण त्याचवेळी डॉक्टरांना, नर्सना, आरोग्यसेविकांना एन ९५ मास्क, प्रोटेक्टिव्ह सूट्स पुरविले पाहिजेत. या स्थितीत देशात महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारली गेली पाहिजेत. त्याचबरोबर तात्पुरते आयसीयू सुद्धा तयार केले गेले पाहिजेत. सर्व ठिकाणी व्हेंटिलेटर्स उपलब्ध असले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

नागरिकांना धान्याऐवजी मिळणार पीठ : बाळासाहेब थोरात

कालच माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही लॉकडाऊन करण्याच्या घोषणेचे स्वागत केले होते. त्यांनीही सरकारपुढे काही मागण्या केल्या होत्या. देशात बुधवारपासून २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात कोणालाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे.