पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे उंदरांचं मटण विकणाऱ्या गरीब चिनी शेतकऱ्यांवर संकट

बू रॅट

बांबू रॅट म्हणजेच चीनमध्ये आढळणारी एकप्रकारची उंदराची प्रजाती. या उंदरांचं मांस विकून चीनमधील दुर्गम भागात राहणारे अत्यंत गरीब शेतकरी आपलं पोट भरत होते. या बांबू रॅटमुळे त्यांना चांगला नफा मिळत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती हळहळू सुधारत होती, मात्र कोरोना विषाणुच्या फैलावामुळे या गरीब शेतकऱ्यांचंही जगणं अवघड झालं आहे. 

अनेक स्थानिक सरकारनं या गरीब शेतकऱ्यांना  बांबू रॅट पालनासाठी मदत केली होती. आपल्याइथे कुक्कुटपालन किंवा मत्सपालन आहे, तसेच तिथे या व्यवसायासाठी स्थानिक सरकारनं  शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवलं होतं. मात्र आता बिजिंगमध्ये कोरोना विषाणूमुळे जंगली प्राण्यांचं मांस विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार सुरु आहे. 

कोरोनामुळे दक्षता, तुळजाभवानीचे मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

चीनच्या डोंगरावर राहणारे आणि हे उंदीर पाळणारे अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्याजवळ हे उंदीर पाळून त्यांचे मासं विकण्यापलीकडे अर्थाजनाचा दुसरा मार्ग नाही, त्यातले  अनेक लोक हे दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकदेखील आहेत, अशा परस्थितीत त्यांना इतर काम मिळणं हे शक्य नाही, अशी माहिती इथल्या एका  उंदीर पाळणाऱ्या व्यक्तीनं दिली. 

 या वर्षांच्या अखेरपर्यंत ५० दशलक्ष लोकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर काढायचं असा चीनचा उद्देश होता, मात्र कोरोना विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचं पूर्ण गणितच बिघडलं आहे. केवळ  बांबू रॅटच्या मटणावर बंदी घातल्यानं १०५ अब्जांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यावरुन हा व्यवसाय किती मोठा आहे याची कल्पना आपण करु शकतो. 

कोरोनाचा आशियातील सर्वात मोठ्या देहविक्री व्यवसायालाही फटका

चीनच्या काही भागात तर गेल्या ३० वर्षांपासून उंदीर पाळून त्यांचे मांस विकले जात आहे. चीनच्या दक्षिण भागात उंदारांचं मांस मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. मात्र आता कोरोनामुळे चीनमध्ये त्यावर बंदी घालण्याचा विचार आहे, त्यामुळे लाखो गरीब शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. 

देशातल्या ५४ % कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य नाही