कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशवासियांनी सढळ हातांनी मदत करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी शनिवारी एका ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना यासंदर्भात आवाहन केले. मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, कोविड-१९ च्या लढ्यामध्ये देशवासियांना स्वेच्छेने मदत करायची आहे. जनतेच्या मनातील भावना लक्षात घेऊन 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'आपतकालीन मदत निधी' च्या माध्यमातून मदत जमा करण्यात येत आहे. स्वस्थ भारतासाठी हा निधी उपयुक्त ठरेल.
कुणाचं काय तर कुणाचं काय, ऋषी कपूर म्हणतात, मद्य विक्रीला परवानगी द्या
पीएम केयर्स फंडामध्ये अंशदान करुन देशवासियांनी स्वेच्छेने मदत करावी, अशी आवाहन मोदींनी केले आहे. या निधीचा उपयोग हा भविष्यातील आपतकालीन परिस्थितीतही उपयुक्त ठरेल, असा उल्लेखही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. विशेष म्हणजे पंतप्रधान निधीसाठी सर्व सामान्यांना ऑनलाइन पद्धतीनेही मदत जमा करता येणार आहे.
कोरोनाशी लढा: टाटा ट्रस्टकडून तब्बल ५०० कोटींची मदत
मोदी सरकारने याची खास सुविधा उपलब्ध करुन दिली असून पेटीएम, डेबिड कार्ड, नेट बँकिंग याच्या माध्यमातून मदत जमा करणे शक्य होणार आहे. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १४ एप्रिलपर्यंत घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचा देशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
The PM-CARES Fund accepts micro-donations too. It will strengthen disaster management capacities & encourage research on protecting citizens. Let us leave no stone unturned to make India healthier and more prosperous for our future generations: PM Narendra Modi. https://t.co/HataV5DRqJ pic.twitter.com/fv2FeNQmwB
— ANI (@ANI) March 28, 2020