पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: आर्थिक मदत करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधानांकडून बॉलिवूड कलाकारांचे कौतुक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कोरोनापासून देशाला वाचवण्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. एकीकडे काही कलाकार जनतेला घरामध्ये राहण्याचे आवाहन करत जनजागृती करत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकारांनी आपल्यापरीने आर्थिक मदत पीएम- केअर फंडासाठी दिली आहे. बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या आर्थिक मदतीवर खूश होत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे. 

छोट्या सरकारी गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात मोठी कपात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांचे कौतुक केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'देशाला निरोगी ठेवण्यासाठी देशातील सेलिब्रिटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ते फक्त जनजागृती करत नाही तर त्यांनी पीएम केअर फंडासाठी आर्थिक मदत करत योगदान दिले आहे.' पंतप्रधानांनी या ट्विटमध्ये आर्थिक मदत करणाऱ्या अजय देवगन, नाना पाटेकर, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, बादशाह, रणवीर शौरी आणि गुरु रंधावा यांना टॅग केले आहे. पंतप्रधानांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँका आजपासून इतिहासजमा, अन्य बँकात विलिनीकरण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी २५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. रणदीप हुड्डाने १ कोटी, कार्तिक आर्यनने १ कोटी, विक्की कौशलने १ कोटी, वरुण धवनने ५५ लाख, ऋतिक रोशनने २० लाख, कपिल शर्माने ५० लाख, शिल्पा शेट्टीने २० लाख, अनुष्का शर्माने ३ कोटी, तमिळ अभिनेता प्रभासने ४ कोटी, गुरु रंधवाने २० लाख, बादशाहने २५ लाखांची आर्थिक मदत केली आहे. आर्थिक मदत करणाऱ्यांच्या यादीत अमिताभ बच्चन, सलमान खान, माधुरी दीक्षित, करीना कपूर, सैफ अली खआन, सारा अली खान यांचे देखील नाव आहे. 

कोविड १९ चाचणी मोफत करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus pm narendra modi thanks to bollywood celebraties who donated to pm cares fund