पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व जनता करतेय: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत आहे. देशातला प्रत्येक नागरिक कोरोनाविरोधात लढा देत आहे. देशातील सर्व जनता या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज सगळीकडे सर्व जण मदतीसाठी पुढे आले आहेत. भविष्यात या लढाईची चर्चा होईल तेव्हा भारतातील 'पीपल ड्रिव्हन' लढाईची चर्चा जरूर होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधातील लढाई एकजुटीने लढणाऱ्या सर्वांचे आभार मानले. 

कितीही डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार: संजय राऊत

आपल्या शहरात, गावात, ऑफिसमध्ये आणि गल्लीत कोरोना पोहोचला नाही म्हणजे तो कधीच येणार नाही असा अतिआत्मविश्वास बाळगू नका, असे आवाहन मोदींनी केले आहे. जगाचा अनुभव पाहून आपण शिकलो आहोत. नजर हटी तो दुर्घटना घटी. त्यामुळे अतिउत्साहात निष्काळजी होऊ नका असे मोदींनी सांगितले. सध्या शहर असो वा गाव सगळीकडे देशात महायज्ञ सुरु असल्यासारखे वाटते. यामध्ये सर्व जण आपापल्या पद्धतीने योगदान करत असल्याचे मोदींनी सांगितले. 

कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

देशातील सर्वजण सामर्थ्याने कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे. भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री आहे. तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत. कोणी मास्क बनवतं, कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे. तसंच शेतकरी सुद्धा या लढाईत आपले योगदान देत आहे, असे मोदींनी सांगितले. 

कोविड-१९:राज्यात ८११ नवे रुग्ण, एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जे महत्वपूर्ण काम करत आहे. त्याचे काम प्रशंसा करण्यासारखे असल्याचे मोदींनी सांगितले. तसंच, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहे. गरिबांना तीन महिन्याचे मोफत रेशन दिले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांचा प्रत्येक विभाग एकत्र येऊन कोरोनाविरोधात काम करत आहे. या लढाईत नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहे, असे ते म्हणाले.

कोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

covidwarriors.gov.in या माध्यमातून सव्वा कोटी डॉक्टर, नर्स, प्रशासन, आशा सेविका असे अनेक कोविड १९ लढवय्ये एकत्र जोडले गेले आहेत. ५०० टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यात आले असल्याचे मोदींनी सांगितले. पोलिस, सफाई कर्मचारी यांच्याविषयी जनतेचा दृष्टीकोन बदलला आहे. पोलिसांमधील माणूस आज सर्वांना पहायला मिळाला. पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत. यामुळे पोलिसांशी भावनिक नातं जोडलं असल्याचे मोदींनी सांगितले. 

सिब्बल म्हणाले, मोदीजी CAA, NRC वाद विसरुन कोरोनाविरोधात एकत्र लढू

तसंच, संकटाच्या या घडीत जगातील इतर देशांना भारताने औषधांचा पुरवठा केला आहे. कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता. मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता मानतेचे काम करत संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, असे मोदींनी सांगितले. आजचा दिवस अक्षय्य तृतीयेचा आहे. आपली धरती, पर्यावरण अक्षय्य राहील असा संकल्प करुया, असे आवाहन मोदींनी केले. घरात राहूनच सण-उत्सव साजरे करु. ईद येण्यापूर्वी कोरोनाचे संकट दूर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीला परवानगी नाहीच, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण