पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनुकरणीय! अंत्ययात्रेवेळी पाळले सोशल डिस्टन्सिंगचे नियम

अंत्ययात्रे दरम्यान पाळला सोशल डिस्टन्सिंगचा नियम

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत चालली आहे. अशामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र अनेक जण या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूर येथे एक वेगळेच चित्र पहायला मिळाले. अंत्ययात्रे दरम्यान नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केल्याचे पहायला मिळाले.

कोरोनाशी लढ्यासाठी सचिन आला धावून, सर्वात मोठी आर्थिक मदत

शुक्रवारी सकाळी शाहजहांपूर येथे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने जनतेच्या हितासाठी सांगितलेल्या नियमांचे पालन अंत्ययात्रे दरम्यान करण्यात आले. या अंत्ययात्रेला नागरिकांनी गर्दी केली नव्हती. या अंत्ययात्रेमध्ये फक्त १० जण सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी तोंडाला मास्क लावले होते.  प्रत्येकाने एकमेकांमध्ये तीन ते चार फूटाचे अंतर ठेवले होते. ऐवढेच नाही तर स्मशानभूमीमध्ये देखील सर्वजण एकमेकांपासून लांब उभे राहिले होते.

ICC च्या 'या' निर्णयामुळे टी-20-वर्ल्ड कप स्पर्धाही संभ्रमात

सरकारने वारंवार सांगून देखील न ऐकणाऱ्यांसाठी हा एक चांगला धडा आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी असे सांगितले जात आहे. तरी सुद्धा अनेक जण गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहे. काही जण एकत्र बसून गप्पा मारत आहे. या सर्वांना आधी पोलिसांकडून विनंती केली जात होती. मात्र आता पोलिसांकडून त्यांना काठीचा चोप दिला जात आहे.