पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे अमेरिकेत २ लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतातः व्हाईट हाऊस

डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतील सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे या विषाणूविरोधात लढणाऱ्या तेथील दोन वैज्ञानिकांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या टास्क फोर्सचे सदस्य अँथनी फोसी आणि डेबोराह बिरक्स म्हणाले की, अमेरिकेत शाळा, रेस्तराँ, सिनेमा आणि सर्व हालचाली बंद करुन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करुनही १ लाख ते २ लाख ४० हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३२० वर

या दोघांनी इशारा देत म्हटले आहे की, जर काहीच केले नाही तर अमेरिकेत १.५ मिलियन ते २ मिलियनपर्यंत मृत्यूचा आकडा वाढू शकतो. डेबोराह बिरक्स यांनी एक तक्ता सादर करत म्हटले की, देशात या आजारामुळे एक लाख ते २ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग काम करत आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसत आहे. कदाचित हिच आतापर्यंतची सर्वांत चांगली रणनीति आहे, असेही त्यांनी म्हटले. 

डेबोराह बिरक्स पुढे म्हणाले की, ही काही जादू नाही. सोशल डिस्टन्सिंगमुळेच कोरोनामुळे होणारे मृत्यूचे आकडे कमी करता येतील. आम्हाला विश्वास आहे की, दररोज आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. 

कोरोनाविरोधातील लढ्याचे नेतृत्त्व करणारी मराठमोळी व्यक्ती

दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या देशवासियांना सावध केले आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रकोप परमोच्च शिखरावर पोहोचला आहे. येणाऱ्या दोन आठवड्यांसाठी देशवासियांनी तत्पर राहिले पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक कठीण दिवसांसाठी नागरिकांनी सज्ज राहिले पाहिजे. 

जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे ३७०० जणांचा मृत्यू झाला असून १८५००० जणांना याची बाधा झाली आहे.

कोरोनाशी लढा : खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतले १४६ परिसर सील