पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात मोठा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गर्दी आणि कोरनोच्या वाढत्या संक्रणण रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश देण्यात आला आहे. उर्वरित ५० टक्के लोकांनी कार्यालयात यावे, असा तात्पुरत्या स्वरुपाचा बदल करण्यात आला आहे.  

गर्दी कमी झाली नाही तर नाईलास्तव लोकल बंद करावी लागेल: आरोग्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३१ मार्चपर्यंत खासगी कंपन्या, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे, यासारख्या अनेक ठिकीणी निर्बंध घालण्यासंदर्भातील सूचना केंद्राकडून करण्यात आल्या होत्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. 

देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात आतापर्यंत १६० हून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तीन लोकांनाचा या विषाणूने जीवही घेतला आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरु ठेवण्याचा प्रयोग सुरु आहे. सेवा संपूर्ण ठप्प होऊ नये याची काळजी सरकार वेगवेगळ्या पद्धतीच्या निर्णयातून घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus pandemic Central govt asks 50 per cent of its staff to work from home and remaining to attend office