पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID-19: पाकिस्तानने कराचीमध्ये ८० एकर जागेवर उभारले नवीन कब्रस्तान

कब्रस्तान (प्रातिनिधिक छायाचित्र)

जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. या विषाणूने पाकिस्तानमध्ये देखील शिरकाव केला असून आतापर्यंत ३५ जणांचा बळी घेतला आहे. अशातच पाकिस्तानमधील सिंध सरकारने कराचीमध्ये एक नवीन कब्रस्तान उभारले आहे. सरकारने सुपर हायवे आणि नॅशनल हायवेला जोडणाऱ्या लिंक रोडवर कब्रस्तानसाठी तब्बल ८० एकर जमीन दिली आहे. तर, १ एप्रिलपर्यंत सिंध प्रांतामध्ये कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

निजामुद्दीन मरकज: ९६० परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश  

पाकिस्तानच्या एआरवाय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. कराची येथे उभारण्यात आलेल्या कब्रस्तानमध्ये फक्त कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला दफन करण्यात येणार आहे. तर, पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत २,४५० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर आतापर्यंत ३५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

एका धोबी व्यावसायिकामुळे सूरतमध्ये ५४००० लोक क्वारंटाइन

पाकिस्तानातील सर्वात मोठा असलेल्या पंजाब प्रांतात ९२० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सिंध प्रांतात ७८३, खैबर पख्तूनख्वामध्ये ३११, बलूचिस्तानमध्ये १६९, गिलगित बाल्टिस्तानमध्ये १९०, इस्लामाबादमध्ये ६८ आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत १२६ कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

नवी मुंबई: CISFच्या आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण