पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून मोर्चेबांधणी सुरु

चीन आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज

कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने मोर्चबांधणी सुरु केली आहे. अमेरिका यासंदर्भात इतर राष्ट्रांना आपल्या बाजून वळवण्याचे प्रयत्न करत आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूची उत्पती झाली. या विषाणूची उत्पती कशी झाली? याचे उत्तर चीनने द्यायला हवे, असे  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी म्हटले आहे. इतर देशांना एकत्रित करुन चीनवर दबाव टाकणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.   

'केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देय महागाई भत्ता रोखण्याची गरज नव्हती'

माइक पोम्पियो म्हणाले की, कोरोना विषाणूच्या मुद्यावर दुसऱ्या राष्ट्रांशी चर्चा सुरु आहे. या विषाणूची उत्पती ही चीनच्या वुहान शहरात झाली हे आम्ही इतर राष्ट्रांना सांगत आहोत. विषाणूसंदर्भात निर्माण होणाऱ्या उकल ही चीनने सर्वांसमोर करायला हवी. ते पुढे म्हणाले, डिसेंबर 2019 मध्येच चीनमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. चीनमधून देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा वाढत असून अर्थकारणावरही याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. जगभरात घोंगावत असलेल्या संकटाला चीन जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.  

देशात २४ तासांत कोरोनाचे १४२९ रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २४,५०६ वर

कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतीलच नव्हे तर जागतिक अर्थकारण कोलमडले आहे. यासंदर्भातील रणनितीवर आम्ही इतर देशांशी चर्चा करत आहोत. जागतिक व्यापार पूर्ववत सुरु करण्याच्या दृष्टीनेही योग्य ती पावले उचलली जातील, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले. चीनने सुरुवातीच्या काळात कोरोना विषाणूसंदर्भातील माहिती लपवल्याने जगाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. चीन यासंदर्भातील उपाय योजना करण्यासाठी अकार्यक्षम ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचेही त्यांनी उल्लंघन केले. कोरोनासंदर्भातील परिस्थिती लपवण्यासाठी त्यांनी बरेच काही केले. यासर्वाचे उत्तरे त्यांना द्यावीच लागतील, असा इशाराच अमेरिकने चीनला दिला आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus outbreak US will make sure other countries know that coronavirus originated in China says Mike Pompeo