पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू : ... म्हणून गूगलने आपल्या सर्च रिझल्टमध्ये केला बदल

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई

चीनमध्ये सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आता जगातील १७ देशांत आढळले आहेत. चीनमध्ये तर या आजाराने भीषण स्वरुप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले. आता गूगलनेही या आजाराचे गांभीर्य ओळखून काही तातडीचे निर्णय घेतले आहेत. वाचकांना या आजाराबद्दलची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी आपल्या सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये (SERP) बदल करण्यात आले आहेत.

औरंगाबादमध्ये भाविकांच्या गाडीला अपघात; चौघांचा मृत्यू

जर कोणताही वाचक किंवा युजर गूगलच्या पेजवर जाऊन कोरोना व्हायरस असे टाईप करत असेल तर त्याला सर्वात आधी या आजारापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या टीप्स, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली मार्गदर्शक माहिती, त्याचे ट्विटरवरील ताजे अपडेट्स आणि इतर अद्ययावत माहिती सर्च रिझल्टमध्ये प्राधान्याने दिसणार आहे. त्यासाठी सर्च इंजिनचे निकाल दाखविण्याच्या यंत्रणेमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती गूगलकडून शुक्रवारी देण्यात आली.

गूगलने केवळ आपल्या सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये बदल केलेला नाही तर त्याचबरोबर या आजाराशी लढण्यासाठी आर्थिक मदतही केली आहे. चीनमधील रेड क्रॉस सोसायटीला गूगलकडून २५०००० डॉलरची मदत करण्यात आली आहे. गूगल डॉट ऑर्गकडून ही मदत देण्यात येणार आहे. 

विप्रोच्या सीईओंचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पायउतार

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे गूगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हाँगकाँग आणि तैवानमधील कार्यालयेही तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहेत. या विषाणूची लागण झालेले रुग्ण आता अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलियामध्येही आढळले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus outbreak Google launches SOS Alert with WHO to show helpful tips in result page