पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID-19: जगभरात ६ हजारांहून अधिक लोकांनी गमावला जीव

कोरोनाचा कहर

कोरोना विषाणूने माजवलेल्या थैमानात आतापर्यंत ६ हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा वाढल्यानंतर जगभरातील कोराने जीव गमावलेल्यांचा आकडा ६ हजारपेक्षा अधिक झाला आहे. स्पेनमध्ये मागील २४ तासांत १०५ लोकांनी जीव गमावला आहे. स्पेनमधील आकडेवारीनंतर जगभरात कोरोनाने मृत पावलेल्यांचा आकडा हा ६ हजार ३६ वर पोहचला आहे. १ लाख ६२ हजार ४६७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून एकट्या स्पेनमध्ये २४ तासांत दोन हजार नवे रुग्ण आढळले आहेत. 

सार्कच्या खास बैठकीत पाकने उपस्थित केला जम्मू-काश्मीरचा मुद्दा

चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३ हजार १९९ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. चीनमधील वुव्हानमध्ये मृत्यूच थैमान कमी होत असताना आता युरोपात मृत्यू तांडव निर्माण झाल्याचे चित्र आहे.  इटलीमधील १ हजार ९०७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीनंतर स्पेन युरोपातील कोरोनाने मोठ्या प्रमाणा प्रभावित झालेले दुसरे राष्ट्र आहे.  स्पेन सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत  ७ हजार ७५३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातील २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त, मोदी- ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा

भारतमध्ये दोन जणांनी गमावलाय जीव 
भारतामध्येही कोरोनाचा कहर दिसून येत आहे. आतापर्यंत १०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा ३० हून अधिक झाला आहे. कर्नाटकमधील कुलबर्गी आणि दिल्लीत प्रत्येकी एका रुग्णाने कोरोनामुळे जीव गमावल्याचे पुष्टी झाली आहे. 

इराणमध्ये ७२४ जणांनी गमावला जीव 
इराणध्ये एका दिवसात ११३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आळे आहे. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू होण्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडला. १५ मार्चच्या आकडेवारीनंतर मृतांचा आकडा हा ७२४ वर पोहचला आहे.