पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SAARC मधील राष्ट्रांना मोदींनी दिला मंत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केली सार्क राष्ट्रांच्या नेत्यांसोबत चर्चा

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता जगभरात संकट निर्माण केले आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर सार्कचे (आशिया खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना) सदस्य असणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. या खास चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरून न जाता संकटाशी लढणे हाच आपला मंत्र असल्याचे सांगितले. 

कोरोना : MPSC Exam पुढे ढकलणार, राज्य सरकारची अयोगाकडे विनंती

ते पुढे म्हणाले, विकसनशील राष्ट्रांसमोर कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही वेळोवेळी योग्य ती पावले उचलली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचा प्रस्ताव ठेवला होता.

२८९ प्रवाशांना दुबईला घेऊन जात असलेल्या विमानात कोरोना

जगभरात वेगाने संक्रमण करत असलेल्या कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. सार्कच्या खास बैठकीत त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदींनी ७४ कोटींची मदत जाहीर केली. प्रत्येक राष्ट्रांनी आपल्या इच्छेनुसार, कोविड-१९ अपातकालीन निधीमध्ये निधी जमा करावा, असेही मोदींनी यावेळी सांगितले.