पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रभक्तीचं नवं फॅड, चक्क 'लॉकडाऊन' ठेवलं मुलाच नाव

लॉकडाऊन दरम्यान जन्माला आल्यामुळे बाळाचे नाव ठेवले लाकडाऊन

कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये एका बाळाचा जन्म झाला. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव 'लॉकडाऊन' ठेवले आहे. बाळाचे नाव लॉकडाऊन ठेवल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. तर या आधी गोरखपूरमध्ये जन्माला आलेल्या मुलीचे नाव कोरोना ठेवण्यात आले होते. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ वर; मुंबईत १४ नवे रुग्ण

उत्तर प्रदेशच्या देवरीयामध्ये राहणाऱ्या पवन कुमारची पत्नी नीरजाला २८ मार्च रोजी मुलगा झाला.  गावातील सामुदायिक स्वास्थ्य केंद्रावर तिने बाळाला जन्म दिला. मुलाचे वडील पवन यांनी सांगितले की, 'आमच्या बाळाचा जन्म लॉकडाऊन दरम्यान झाला. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. लॉकडाऊन राष्ट्रीय हितात असल्याने आम्ही आमच्या मुलाचे नाव 'लॉकडाउन' ठेवले आहे.'

लॉकडाऊन: जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

पवन यांनी पुढे सांगितले की, माझ्या मुलाचे नाव नेहमीच लोकांना राष्ट्रहिताची आठवण करून देईल. आम्ही मुलाची देखभाल करत आहोत. आम्ही आमच्या नातेवाईकांना मुलगा झाल्याबद्दल सांगितले आहे. तसंच, त्यांना लॉकडाऊन दरम्यान बाळाला भेटायला येऊ नका असे देखील सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी गोरखपूर येथे जन्माला आलेल्या एका मुलीचे नाव कोरोना ठेवण्यात आले होते. तिच्या नावाची चर्चा देखील सगळीकडे सुरु आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी तो नॅशनल ट्रेंड नाही, कारण...