पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : गौतम गंभीर यांचे दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला

गौतम गंभीर

माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पंतप्रधान मदतनिधीमध्ये आपले योगदान दिले आहे. गौतम गंभीर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याचे गुरुवारी जाहीर केले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.

भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक

सध्या जगातील सर्वच देश कोविड १९ या आजाराचा मुकाबला करीत आहेत. भारतातही कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होतो आहे. देशात आता कोविडा १९ आजार झालेल्यांची संख्या १९०० च्या पुढे गेली आहे. त्याचवेळी ५० रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

गौतम गंभीर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोक विचारतात की त्यांच्या देशाने त्यांच्यासाठी काय केले. पण खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या देशासाठी काय केले. मी माझे दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला देतो आहे. तुम्ही सुद्धा पुढे आले पाहिजे 

कोरोनाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक

गौतम गंभीर सोबतच क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, मिताली राज यांनीही कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपापली मदत जाहीर केली आहे.