पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: १४ एप्रिलपर्यंत सर्व गाड्या रद्द, रेल्वेचा मोठा निर्णय

भारतीय रेल्वे

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून परिपत्रक जारी करत ही माहिती देण्यात आली आहे.

महाभारत १८ दिवसांत जिंकले होते, कोरोनाची लढाई २१ दिवसांत जिंकू : मोदी

रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये असे म्हटले आहे की, 'सर्व प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या आणि कोलकाताच्या मेट्रो गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिल २०२० पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच, या काळामध्ये फक्त मालगाडी चालवण्यात येणार असल्याचे, रेल्वे मंत्रालयाने सांगितले. 

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यते वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २२ मार्च म्हणजेच रविवारी केंद्र सरकारने सर्व प्रवासी गाड्या, रेल्वे, मेट्रो रेल, बससेवा ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच रेल्वे मंत्रालयाने देखील ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत मालवाहतूक गाड्यांशिवाय इतर कोणत्याही गाड्या धावणार नाहीत, असे सांगितले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus ministry of railways has decided to extend the cancellation of passenger train services till 14th april 2020