पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कौतुकास्पद! घरमालकाने ५० भाडेकरुंचे दीड लाखांचे भाडे केले माफ

लॉकडाऊनच्या काळात ५० भाडेकरुंचे घरभाडे माफ

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका मजूरांना बसत आहे. हातात काम नसल्याने पैसे नाही त्यामुळे घर भाडे कसे द्यायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मजूर आपल्या गावाकडे निघाले आहेत. अशामध्ये नोएडातील एक व्यक्ती या मजूरांसाठी देवदूत ठरली आहे. या घरमालकाने ५० भाडेकरुंचे घरभाडे त्यांनी माफ करत माणुसकी जपली आहे. ऐवढेच नाही तर त्यांनी प्रत्येक भाडेकरुंना ५ किलो पीठ वाटले आहे.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

नोएडा येथील सेक्टर ४९ मध्ये राहणारे कौशल पाल यांनी आपल्या ५० भाडेकरुंचे घरभाडे माफ केले आहे. त्यांनी या भाडेकरुंना मदत करत त्यांना याच ठिकाणी रहा गावाकडे जाऊ नका अशी विनंती केली. लॉकडाऊनमुळे लोकांच्या उत्पन्नाची साधनंही बंद पडली आहेत. दोन दिवसानंतर नवीन महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व भाडेकरूंना भाडे कसे द्यावे याची चिंता होती. अशात कौशल पाल यांनी आपल्या भाडेकरूंना भाडेमाफ करत मोठा दिलासा दिला.

लॉकडाऊननंतर नरेंद्र मोदी यांचे दैनंदिन काम नेहमीप्रमाणेच, फक्त...

कौशल पाल यांनी आपल्या सर्व भाडेकरूंना ५-५ किलो पीठही दिले. जेणेकरून कोणीही उपाशी राहणार नाही. भाडेकरू व्यतिरिक्त त्यांनी आपल्या ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकाला ही मदत दिली. कोरोनामुळे त्यांनी प्रत्येक भाडेकरुला गावाकडे जाऊ नका असे आवाहन केले. कौशल पाल यांना महिन्याला ५० भाडेकरुंकडून १.५० लाख रुपये मिळतात. मात्र माणुसकी म्हणून त्यांनी सर्वांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला. तसंच, त्यांनी सर्व भाडेकरुंना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा, असे आवाहन देखील केले आहे. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी महाराष्ट्राला 'विरुष्का'ची मदत