पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना लॉकडाऊनः मोदी सरकार देशाची तीन झोनमध्ये विभागणी करण्याची शक्यता

कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे

देशात कोरोनाचे थैमान वाढतच चालले आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०० च्या वर गेली आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा धोका पाहता लॉकडाऊन वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार देशाला तीन झोनमध्ये विभागण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे. झोनमध्ये विभागणी करुन सरकार काही सूट देऊ शकते. लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपत आहे आणि अनेक राज्यांनी हा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. 

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ४३ वर, १५ नव्या रुग्णात वाढ

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन

सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने 'पीटीआय'ने म्हटले आहे की, सर्वांधिक कोरोना विषाणूचे प्रकरणे जेथून समोर आली आहेत. ती रेड झोनमध्ये जातील. रेड झोनमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन असेल. जिथे संक्रमित लोक जास्त असतील अशा परिसराचा यात समावेश असेल. ऑरेंज झोनमध्ये अशा परिसराचा किंवा जिल्ह्याचा समावेश असेल, जिथे कोरोना विषाणूबाधितांची प्रकरणे कमी आली आहेत आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली नाही. ऑरेंज झोनमध्ये पिकांची कापणी आणि मर्यादित सार्वजनिक वाहतुकीला परवानगी दिली जाऊ शकते. तर जिथे कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आले नाही त्या परिसराचा ग्रीन झोनमध्ये समावेश होऊ शकतो.

ताज हॉटेलच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या काही छोट्या उद्योगांना सुरुवात करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. परंतु, कर्मचाऱ्यांना कंपनीतच राहण्यास सांगितले जाऊ शकते. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे संपूर्णपणे पालन करावे लागेल. देश पूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार नाही, हे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus lockdown Modi Govt may divide country in red orange and green zones amid covid 19 Lockdown