पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीमा सील करा, वाहतूक रोखा, केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

देशातील काही भागात प्रवासी कामगारांची वाहतूक सुरु आहे. राज्यांना जिल्ह्याच्या सीमा प्रभावीपद्धतीने स

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाला लॉकडाऊनदरम्यान प्रवासी कामगारांना रोखण्यासाठी प्रभावीपद्धतीने राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान कॅबिनेट सचिव राजीव गोबा आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शहरांत आणि राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे. 

आशादायी ! राज्यातील ३४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील काही भागात प्रवासी कामगारांची वाहतूक सुरु आहे. राज्यांना जिल्ह्याच्या सीमा प्रभावीपद्धतीने सील करण्याचे निर्देश दिले आहेत. या रस्त्यांवरुन कोणत्याही प्रकारची वाहतूक झाली नाही पाहिजे. केवळ साहित्य ने-आण करण्याची परवानगी दिली जावी. जे लोक विद्यार्थी आणि मजूरांना जागा रिकामी करण्यास सांगत आहेत. त्यांच्यावर सख्त कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. 

या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची राहिल. प्रवासी कामगारांसह गरजू आणि गरीब लोकांना भोजन आणि निवासाची सोय केली जाईल. 

गर्दी करु नका नाहीतर कठोर पावलं उचलावी लागतील, ठाकरेंचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हात जोडून आपल्या घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. नागरिक घराबाहेर पडून स्वतः या आजाराला निमंत्रण देतील, असे त्यांनी म्हटले आहे.