पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक

इंदूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

देशात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत चालला आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना विषाणूच्या या संकटातून सर्वसामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. परंतु, काही असंतुष्ट लोकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे, त्यांच्यावर थुंकण्यासारखे किळसवाणे प्रकार करत आहेत. इंदूर येथील असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका वयोवृद्ध महिलेची तपासणी करायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन त्यांना पळवून लावले आहे. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. 

भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचा वेग तुलनेत कमी, इराणमध्ये सर्वाधिक

ही घटना इंदूर येथील टाटपट्टी बाखल परिसरातील आहे. तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. बुधवारी या परिसरातील एका वयोवृद्ध महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकात डॉक्टर, नर्स आणि आशा कार्यकर्त्या होत्या. या पथकाला स्थानिकांनी विरोध केला आणि लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण करत त्यांचा पिच्छा सुरु केला. त्यामुळे आरोग्य कर्मचारी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. यावेळी त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. 

निजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका, शरद पवार यांची विनंती

एका वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओही जारी केला आहे. यामध्ये लोक या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसतात. या कर्मचाऱ्यांना अपशब्दाचाही वापर केल्याचे व्हिडिओत ऐकू येते. हल्लेखोरांनी बॅरिकेडही तोडले. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य कर्मचारी त्या महिलेची तपासणी करण्यास आले होते. 

रामनवमी निमित्त पंतप्रधान मोदींचे टि्वट, म्हणाले, जय श्रीराम !

एकीकडी देशभरात आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे असेही प्रकार घडत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Lockdown Locals of Tatpatti Bakhal in Indore pelt stones at health workers Madhya Pradesh