पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३३ हजारांवर पोहचली आहे. तर गेल्या १२ तासांमध्ये भारतात १ हजार २६३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ६६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३३ हजार ०५० वर पोहचल आहे. कोरोनामुळे आतापार्यंत देशभरात १ हजार ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित ३३ हजार ०५० रुग्णांपैकी २३ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ८ हजार ३२५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

अमेरिकेत कोरोनाचं तांडव, मृतांचा आकडा ६० हजार पार

कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक ४३२ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९४० वर पोहचला आहे. यामधील ९ हजार ९१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार ५९३ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाला आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 

MLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा