पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार पहिल्यांदाच योग्य मार्गावर, राहुल गांधींची प्रतिक्रिया

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर राहुल गांधी खूश झाले. सरकारने पहिल्यांदाच योग्य पाऊल उचलले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय पण परिस्थिती आटोक्यात

पॅकेजची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांनी टि्वट करत म्हटले की, सरकारने आर्थिक पॅकेजच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. भारतावर शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, श्रमिक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मोठे कर्ज आहे. ते सर्वजचण सध्या लॉकडाऊनमध्ये संकटाचा सामना करत आहेत. 

कोविड 19 : MCA कडून राज्य सरकारला ५० लांखाची मदत

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. त्यामुळे देशातील गरीब आणि हातावर पोट असणाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील गरीब, ज्येष्ठ नागरिक, बचत गट आणि मजुरांसाठी १.७० लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Lockdown first step in the right direction Rahul Gandhi Praise after announcement of financial assistance package