पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: छत्रीच्या सहाय्याने सोशल डिस्टन्सिंगचा अनोखा प्रयोग

सोशल डिस्टन्सिंगसाठी छत्रीचा वापर

देशामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान केरळच्या अलाप्पुझा येथील थेनुर्मकोम ग्रामपंचायतीने सोशल डिस्टन्सिंगसाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना छत्रीचा वापर करा असे आदेश दिले आहेत. 

'कोरोनाविरोधात लढत असताना अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही'

राज्याचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी सांगितले की, जेव्हा दोन लोकं छत्री घेऊन चालतात तेव्हा ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत आणि दोघांमध्ये एक मीटरचे अंतर राहते. सोशल डिस्टन्सिंगसाठी ब्रेक चेन अंब्रेला प्रोजेक्टनुसार स्थानिक नागरिकांना जवळपास १० हजार छत्रींचे वाटप करण्यात येणार आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ज्यांना अनुदानित दराने छत्री खरेदी करता येत नाही त्यांना विविध योजनांतर्गत छत्री मिळू शकते. 

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

या परिसरातील नागरिकांची तपासणी केल्यानंतर याठिकाणी सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. थेनर्मुमकोम जिल्ह्यातील तीन हॉटस्पॉटपैकी हे एक ठिकाण आहे. केरळ राज्यात सध्या ८७ कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. दरम्यान, केरळमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६८ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत चार कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात