पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वयोवृध्द दाम्पत्यांकडून कोरोनाचा पराभव; आज मिळणार डिस्चार्ज

कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर

देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर या विषाणूमुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये वयोवृध्द मोठ्या संख्येने आहेत. अशामध्ये केरळमधील एका वयोवृध्द दाम्पत्यांना कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश आले आहे. ९३ आणि ८८ वर्षीय या कोरोनाबाधित दाम्पत्यांनी आपल्या साध्या जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या बळावर कोरोनाशी दोन हात करत त्याचा पराभव केला आहे. आज या कोरोनाबाधित दाम्पत्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.  

सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर, १ फेब्रुवारीपासून बंदी का घातली नाही?

केरळच्या या वयोवृध्द दाम्पत्यांना इटलीवरुन आलेल्या मुलगा, सून आणि नातवंडांमुळे कोरोना विषाणूची लागण झाली होती. प्रकृती गंभीर झाल्यामुळे दोघांना कोट्टायम वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. मात्र कोरोनाशी दोन हात करुन आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

लॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा

केरळच्या या वयोवृध्द दाम्पत्यांनी प्रकृती गंभीर असून सुद्धा त्यांनी आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली. या दाम्पत्यांच्या नातूने सांगितले की, 'आजारी असताना सुद्धा आजी-आजोबांनी आपल्या खाण्या-पिण्याची शैली बदलली नाही. दोघेही रुग्णालयात असताना सुद्धा मासे, भात, भाजी आणि नारळाची चटणी खायचे. त्यांनी त्यांच्या खाण्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.'

राज्यातील १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

कोरोनामुक्त झालेल्या या वयोवृध्द दाम्पत्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. ते घरी येणार असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आवडीचे जेवण तयार केले आहे. चांगल्या जीवशैलीच्या जीवावर या वयोवृध्द दाम्पत्यांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सर्वांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर योग्य उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

आफ्रिदीला सपोर्ट दिल्याने युवी-भज्जी झाले ट्रोल