पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इटलीत 'कोरोना रिटर्न', एकाच दिवसात ७४३ जणांचा मृत्यू

मंगळवारी इटलीमध्ये ७४३ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. (छायाचित्र-एपी)

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीत सलग तिसऱ्या दिवशी नव्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. इटलीत रविवारी ३९५७, सोमवारी ३७८० आणि मंगळवारी ३६१२ प्रकरणे समोर आली होती. परंतु, मंगळवारी इटलीमध्ये ७४३ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी इटलीत ७९३ जण दगावले होते.

कोरोनाची दहशत, भारतासह जगातील एक तृतीयांश नागरिक घरात कैद

इटलीत नव्या संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये घसरण झाल्याने वैद्यकीय अधिकारी आनंदी आहेत. इटलीने आपली अर्थव्यवस्था आणि स्वातंत्र्य पणाला लावली होती. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. परंतु, एका दिवसानंतर या आनंदावर थोडेसे विरजण पडले. मंगळवारी इटलीत ७४३ लोकांचा मृत्यू झाला. याचदरम्यान इटलीतील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जर्मनीतही यावर उपचार केला जात आहेत. 

जाणून घ्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान काय राहणार सुरु आणि काय बंद

इटलीत ५२४९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सध्या यामुळे बाधित रुग्णांची संख्या ही ६९१७६ पर्यंत पोहोचली आहे. यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या ६८२० इतकी झाली आहे. त्याचबरोबर मृत्यू दरही ९.८ टक्के इतक्या चिंताजनक संख्येवर पोहोचला आहे. आतापर्यंत ८३२६ लोक यातून बरे झाले आहेत. दोन दिवस आकडेवारीत घसरण झाल्यानंतर इटलीतील नॅशनल हेल्थ इन्स्टि्टयूटचे प्रमुख सिल्वियो ब्रुसाफेरो यांनी ही सकारात्मक आकडेवारी असल्याचे म्हटले आहे. पण यात घसरण सुरु झाली आहे, हे म्हणण्याइतके साहस माझ्यात नाही, असेही त्यांनी म्हटले.