पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात? तामिळनाडूत सापडला वेगळा रूग्ण

देशात अजून या विषाणूचा समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत

तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण हा तरूण परदेशात गेला नव्हता. त्याला कोरोना विषाणूची लागण कशी काय झाली, याचा शोध आरोग्य विभागातील अधिकारी युद्ध पातळीवर घेत आहेत. हा तरूण काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता. तेथून तो रेल्वेने तामिळनाडूला परतला होता. या तरूणाला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग हे देशातील या आजाराचे समूह संसर्गाचे पहिले उदाहरण असल्याची शक्यताही वर्तविण्यात येऊ लागली आहे.

'कोरोना विषाणूसंदर्भात आमच्या माहितीकडे WHO ने दुर्लक्ष केले'

हा तरूण काही दिवसांपूर्वी रेल्वेने दिल्लीहून तामिळनाडूला आला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. हा रुग्ण कोरोना विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला नाही. तो परदेशातूनही आलेला नाही. मग त्याला कोरोनाची बाधा कशी काय झाली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रोगपरिस्थिती विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर आर गंगाखेडकर म्हणाले, हा रुग्ण परदेशात गेला नव्हता. तरीही त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. आम्ही हा व्यक्ती कोणा कोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेत आहोत. तपासणीचे काम सखोलपणे करावे लागणार आहे. 

कोरोनाची दहशत : परप्रांतीय निघाले गावाकडे, गाड्यांना मोठी गर्दी

देशात अजून या विषाणूचा समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तामिळनाडूतील प्रकरणात अधिकारी तपास करीत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.