पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅबिनेट बैठकीत दिसली 'सोशल डिस्टन्सिंग'ची झलक, पाहा व्हिडिओ

सोशल डिस्टन्सिंगची झलक

कोरोना विषाणूचा देशात धुमाकूळ सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची झलकही पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागरिकांना सातत्याने सोशल डिस्टन्सिंगचे अनुकरण करण्यास सांगत आहेत. बैठकीत कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून ते मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फॉर्म्युला अंमलात आणत एकमेकांपासून दूर बसल्याचे दिसून आले. 

घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल: मुख्यमंत्री

कोरोना विषाणूबाबत देशाला संबोधित करताना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यावर जोर दिला होता. कोणत्याही संक्रमणापासून बचाव करायचा असेल तर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी किमान एक मीटरचे अंतर असले पाहिजे. 

'एएनआय'ने जारी केलेल्या व्हिडिओत कॅबिनेट बैठकीत सोशल डिस्टन्सिंग राखण्यात आल्याचे दिसते. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांमध्ये मोठे अंतर पाहायला मिळाले. 

काहीही होवो, घराबाहेर पडायचे नाही. सोशल डिस्टन्सिंग. पंतप्रधानापासून ते गावातल्या सामान्य नागरिकापर्यंत सर्वांसाठी असेल. घराची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही तरच आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. आपणा सर्वांना या महामारीचा संसर्ग रोखायचा आहे. त्याच्या प्रसाराची साखळी तोडायची आहे. हा संयम आणि पराकोटीच्या स्वयंशिस्तीचा काळ आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री आवाहन केले होते.

शेअर बाजारात सकारात्मक वातावरण, निर्देशांकात वधारणा