पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाचा वेग मंदावला, मागील १२ तासांत १४० नवीन रुग्ण

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात मागील १२ तासांत १४० नवीन प्रकरणे समोर आली तर तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक दिवसांपूर्वी १२ तासांत ४९० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते आणि २६ जणांचा मृत्यू झाला होता. 

जीवरक्षक औषधांवरील बंदी उठविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढून ४४२१ झाली आहे. संक्रमणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ११४ झाली आहे. एकून रुग्णांपैकी ३२६ रुग्ण ठीक झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ५६ जण बरे झाले आहेत तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

तामिळनाडूमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ६२१ झाली आहे. यामध्ये ८ जण बरे झाले आहेत. तर ५ जणांचा यात मृत्यू झाला आहे. दिल्लीत ५२३ रुग्ण आढळून आले. यात १९ जण ठीक झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

भारताचे मोठे पाऊल, हायड्रोक्सिक्लोरिक्विनवरील निर्यात बंदी हटवली

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३०० पार गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत उत्तर प्रदेशात ३०५ रुग्ण आढळून आले आहेत. तिथे तिघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये १६५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.