पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड १९ चाचणी मोफत करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सर्वोच्च न्यायलय

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांना या संदर्भातील चाचणी मोफतपणे करून दिली जावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील शशांक देव सुधी यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना कोरोना विषाणूची चाचणी मोफत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत तीन दिवसांत ९३ कोटी जमा

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील ५० हून अधिक खासगी लॅब्सना कोविड १९ चाचणी करण्याची मंजुरी दिली आहे. यासाठी त्यांना कमाल ४५०० रुपये शुल्क आकारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दोन प्रकारच्या चाचण्या असणार आहेत. त्यामध्ये स्क्रिनिंगसाठी १५०० रुपये आणि कन्फर्मेशनसाठी ३००० रुपये असून एकूण ४५०० रुपये आकारण्यास अनुमती देण्यात आली आहे. देशातील खासगी लॅब्सनी कोरोना विषाणू चाचणी करण्यास सुरुवातही केली आहे. या पार्श्वभूमीवर शशांक देव सुधी यांनी आपली याचिका दाखल केली. 

म्हणून घराच्या दारात बसून चहा घेऊन परतलेल्या डॉक्टरांचा फोटो व्हायरल

सध्या सरकारी रुग्णांलयांमध्ये ही चाचणी मोफत केली जाते. त्या संदर्भात याचिकेत म्हटले आहे की, सरकारी रुग्णालयात चाचणी करून घेणे अत्यंत अवघड आहे. चाचणी करण्यासाठी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे सामान्य लोक खासगी लॅबमध्ये जाऊन चाचणी करतात आणि त्यासाठी पैसेही देतात. 
कोरोना विषाणूचे संक्रमण अत्यंत गंभीर असून, चाचणी करून रुग्णांना शोधणे हेच तूर्त अत्यंत आवश्यक आहे, असेही याचिकेत म्हणण्यात आले आहे.