पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर दिसताक्षणीच गोळ्या घालू, 'या' मुख्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

मुंबईत लॉकडाऊन

कोरोना विषाणूविरोधात युद्ध लढत असलेल्या भारतात आजपासून २१ दिवसाचे लॉकडाऊन सुरु झाले. याचदरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी न करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. लॉकडाऊन काळात घराबाहेर पडल्यास दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश (शूट ऍट साईट) देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला आहे. 

जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या युरोपात - WHO

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की, जर नागरिक लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करत राहिले तर मला २४ तासांच्या संचारबंदीचे आदेश द्यावे लागतील. माझ्यासमोर अशी परिस्थिती निर्माण करु नका, जेणेकरुन मला पोलिसांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचा आदेश देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोमवारी आणि मंगळवारी लॉकडाऊन असतानाही नागरिक बाहेर आल्याने चंद्रशेखर राव नाराज आहेत. 

तामिळनाडूत विदेशात न गेलेल्या व्यक्तीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू

लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी पेट्रोल पंप बंद करण्याबरोबरच लष्कराची मदत घेण्याचा विचार करत असल्याचे चंद्रशेखर राव यांनी सांगितले. रात्री ७ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असेल. रोज सायंकाळी ६ वाजता सर्व दुकाने बंद झाली पाहिजेत, असे राव म्हणाले.
राज्य सरकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुन देणार कोरोनाची माहिती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus in telangana cm K Chandrashekar Rao says lockdown violators could be shot at sight