पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोरोना केवळ शहरांमध्ये, ग्रामीण भाग सुरक्षित'

कोरोनामुळे सर्वजण सार्वजनिक ठिकाणी फिरताना काळजी घेत आहेत. (संग्रहित छायाचित्र)

कोरोनाचा फैलाव सध्या फक्त देशातील शहरांमध्येच आहे. अजून ग्रामीण भागात कोरोना विषाणू पोहोचलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भाग सुरक्षित आहे, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांनी कोरोनाच्या फैलावावरून उगाच लोकांमध्ये घबराट पसरेल असे काहीही करू नये, अशी सूचना केंद्र सरकारला केली.

होळीनिमित्त सुटीच्या काळात सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच व्हेकेशन बेंच

राज्यसभेमध्ये या विषयावरील चर्चेत भाग घेताना रामगोपाल यादव म्हणाले, कोरोनाचा फैलाव केवळ शहरांमध्येच आहे. अजून गावांमध्ये कोरोना पोहोचलेला नाही. जे सातत्याने परदेशात जातात त्यांची तपासणी करावी, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. कोरोनाचा वेगाने फैलाव होऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजी नक्कीच घेतली पाहिजे. पण उगाच या विषयावरून घाबरून जाण्याचे कारण नाही.

इराणमधून आलेल्या ४९५ जणांचा पत्ता नाही; आरोग्य मंत्रालयाची वाढली चिंता

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदात औषधे नक्कीच आहेत, असेही त्यांनी सभागृहात सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने काय काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. त्यांच्या निवेदनानंतर रामगोपाल यादव यांनी वरील वक्तव्य केले. भारतात गुरुवारी सकाळपर्यंत २९ जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.