पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांवर, २४ तासांत १३८३ नवे रुग्ण

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून २४ तासांमध्ये १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले आहेत तर ५० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांवर पोहचला आहे. आरोग्य विभागाने बुधवारी ही माहिती दिली आहे. 

'मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा केंद्रानं विचार करावा'

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत देशामध्ये कोरोनामुळे ६४० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या १९ हजार ९८४ रुग्णांपैकी १५ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३ हजार ८७० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

कर्तव्यनिष्ठेला सलाम, कामावर पोहोण्यासाठी बस कंडक्टर २१ किलोमीटर धावला

देशामध्ये कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ७२२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर २५१ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढ केली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ज्याठिकाणी कोरोनाचे संक्रमण नाही तिथे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावरील महिला पोलिस कॉन्स्टेबलला कोरोना