पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाबाधितांचा ११ हजार ९३३ वर, ३९२ रुग्णांचा मृत्यू

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ३९२ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९३३ वर पोहचला आहे. 

पुण्यात आणखी ६ जणांनी गमावला जीव, राज्यातील मृतांचा आकडा १८७ वर

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १० हजार १९७ आहे तर उपचारानंतर १ हजार ३४३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मंगळवारी संध्याकाळपासून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील १८, उत्तर प्रदेशचे ६, गुजरातचे ४, मध्य प्रदेशचे ३, दिल्लीचे २, कर्नाटकचे २  तर तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब आणि मेघालयातील प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

कोविड-१९ : राज्यातील ७० टक्के कोरोनाग्रस्त २१ ते ५० वर्षे वयोगटातील

देशभरातमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. देशात आतापर्यंत एकूण ३९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक १७८ मृत रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ५३, दिल्लीमध्ये ३०, गुजरातमध्ये ३०, तेलंगणामध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.  

देशातील १७० जिल्ह्यांवर हॉटस्पॉटचे संकट, आरोग्य मंत्रालयाची माहिती

तसंच, पंजाबमध्ये १३, तमिळनाडूमध्ये १२, उत्तर प्रदेशमध्ये ११, कर्नाटकमध्ये ११, आंध्रप्रदेशमध्ये ९ आणि पश्चिम बंगालमध्ये ७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसंच, जम्मू-काश्मीरमध्ये ४, केरळ, हरियाणा आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३-३, झारखंडमध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मेघालय, बिहार, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि आसामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

वटवाघुळामुळे मनुष्यात कोरोना विषाणू आला? ICMR ने दिले उत्तर