पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काही लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच 'काही ठिकाणी नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.', असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. 

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त, १८ वर्षांच्या नीचांकावर

लव अग्रवाल यांनी पुढे असे सांगितले की, देशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भर पडली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ४४० वर पोहचला आहे. तर २४ तासांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश याठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.' तसंच, लोकांनी सहकार्य केले नाही तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता यावेळी त्यांनी व्यक्त केली. 

कोरोनाशी लढ्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये, ५०० कंपन्यांची निवड पूर्ण

कोरोनाची तपासणी करण्यासाठी देशामध्ये १२३ लॅब कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. तर ४९ खासगी लॅबला परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) स्थानिक उत्पादकांसह एन- ९५ मास्कचा पुरवठा वाढवण्यासाठी काम करत आहे. नागरिकांनी वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांना त्रास देऊ नये, असे आवाहन लव अग्रवाल यांनी केले.

स्पाइसजेटच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्क्यांची कपात

दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगबद्दल सांगताना लव अग्रवाल यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे असे सांगितले. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. तसंच, घरमालकाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये त्यांना घर खाली करण्यासाठी जबरदस्ती करु नये. नाही तर त्यांच्यावर पोलिसांमार्फत कठोर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

कोविड- १९ : २४ तासांत विशेष तज्ज्ञांच्या समितीसह पोर्टल सुरु करा : SC