पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोरोना' राज्यावर ओढवलेली आपत्ती : केरळ सरकार

केरळ राज्य सरकारने कोरोना ही राज्य आपत्ती असल्याची घोषणा केली आहे.

भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या केरळ राज्याने कोरानो विषाणू हा राज्यावरील आपत्ती असल्याची घोषणा केली आहे. आठवड्याभरात केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. तिसरा रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारने   कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती सघ्या संकटाची चाहूल असल्याचे जाहीर केले. 

केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण

केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या आदेशानंतर ही घोषणा केली. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला असून हा आजार अत्यंत प्रभावीपणे रोखण्याचे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. चीनमधून आलेल्या नागरिकांची यादी तयार करुन ही आपत्ती रोखण्याची मोहीम सरकारकडून राबवण्यात येत आहे.  

कोरोनाशी लढण्यासाठी चीनने ९ दिवसांत बांधले नवे रुग्णालय

चीनमधील वुहान शहरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर रविवारी आणखी एका रुग्णाची भर पडल्याचे समोर आले. राज्य सरकारनं नव्याने दिलेल्या माहितीमध्ये केरळमधील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीनवर पोहचला होता. तिसरा रुग्ण हा वुहानमधून भारतात परतल्याची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CoronaVirus has been declared as a state disaster on directions of Chief Minister Pinarayi Vijayan