पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या बळींचा आकडा ८०० पार, WHO विशेष पथक पाठवणार

कोरोना विषाणू

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाच्या बळींचा आकडा ८०० वर जाऊन पोहचला आहे. यातील ७८० जण हे हुबेई प्रांतातील आहेत. कोरोना या जीवघेण्या विषाणूची जगभरात दहशत पाहायला मिळत आहे. जगभरातील जवळपास ३७ हजार लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची सख्या वाढत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेन (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO) चीनमध्ये आपली टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाचा कहर: चीनमध्ये मृतांचा आकडा ७२२ वर, अमेरिकेत एकाचा मृत्यू
 
कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना विशेष पथक चीनमध्ये पाठवणार आहे. सोमवारी ते मंगळवारपर्यंत पथकाचे प्रमुख चीनमध्ये रवाना होतील त्यानंतर इतर सदस्य याठिकाणी पोहचतील, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टीड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी सांगितले आहे. चीनमध्ये जाणाऱ्या विशेष आंतरराष्ट्रीय पथकात अमेरिकेचे सदस्य भाग घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनामुळे आलिशान ब्रँडला असा बसला फटका

चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. केरळमध्ये ३ हजारपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या लागणीसंदर्भातील संशयामुळे  निरिक्षणाखाली आहेत. ४५ हून अधिक लोकांवर रुग्णालयात निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.