पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलासादायक! कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनामुक्त ८ रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशामध्ये मुंबईमधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार घेत असलेले १२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या १२ रुग्णांपैकी ८ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन, नरेंद्र मोदींची घोषणा

मुंबईतल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उपचार घेणाऱ्या १२ रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. त्यापैकी ८ जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरित ४ जणांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या ८ जणांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन रहावे असे सांगण्यात आले.

कोरोनाशी लढ्यासाठी १५ हजार कोटींचे पॅकेज : मोदी

दरम्यान, राज्यामध्ये कोरोनाचे आतापर्यंत १०६ रुग्ण आढळले आहे. कोरोना आजार बरा होता. राज्यामध्ये कोरोनाबाधित १५  रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी दुपारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यावेळी नागरिकांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, घराबाहेर जाऊ नये, गर्दी टाळावी, प्रवास करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.