कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस लढत असलेल्या डॉक्टरांचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. असा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे मध्य प्रदेशमधील डॉक्टर सुधीर डेहरिया यांचा. ते भोपाळ जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. डेहरिया कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांवर उपचार करीत असल्यामुळे पाच दिवसांनंतर आपल्या घरी गेले होते. घराबाहेर बसून चहा घेत असल्याचा त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत तीन दिवसांत ९३ कोटी जमा
डॉ. डेहरिया कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत असल्यामुळे पाच दिवसांनंतर घरी गेल्यावरही त्यांनी घरात प्रवेश केला नाही. घराबाहेर बसूनच त्यांनी चहा घेतला. यावेळी घराच्या प्रवेशद्वारावर त्यांचे कुटुंबिय उभे असल्याचे फोटोत दिसते. योग्य अंतर ठेवूनच त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला, चहा घेतला आणि परत ते जिल्हा रुग्णालयात रवाना झाले. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉ. डेहरिया करीत असलेल्या मेहनतीचे सर्वच जण कौतुक करीत आहेत.
कोरोनामुळे अमेरिकेत २ लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतातः व्हाईट हाऊस
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर केला आहे. डॉ. डेहरिया यांच्यासारखे हजारो डॉक्टर्स सध्या कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी अफाट मेहनत घेत आहेत. त्या सर्वांना माझे शत-शत नमन, असे शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. त्यांच्या ट्विटला ४० हजार लाईक्स मिळाले असून, आठ हजारांहून अधिक लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.
मिलिये डॉ. सुधीर डेहरिया से, जो भोपाल जिले के CMHO हैं। सोमवार को वो पाँच दिन बाद घर पहुंचे, घर के बाहर बैठ कर चाय पी, घर वालों का हाल चाल लिया और बाहर से ही अस्पताल वापस हो गए।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 31, 2020
डॉक्टर डेहरिया और इन जैसे हज़ारों-लाखों #CoronaWarriors को मेरा शत-शत नमन। हमें आप पर गर्व है। 🙏 pic.twitter.com/zAeOy5BavE