पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनता संचारबंदीमुळे रविवारी दिल्ली मेट्रो सेवा बंद राहणार

दिल्ली मेट्रो

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी, २२ मार्चला देशात सकाळी सात ते रात्री नऊ या काळात जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली मेट्रोने येत्या रविवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी रविवारी आपापल्या घरातच थांबावे. बाहेर पडू नये, यासाठी दिल्ली मेट्रोची सेवा त्या दिवशी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

कोरोना : ... अजित पवारांच्या मध्यस्थीने पुणे महापालिकेला दिलासा

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री देशवासियांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी येत्या रविवारी देशातील सर्व जनतेने जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणूचे संक्रमण भारतात रोखण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले आहे. या दिवशी अत्यावश्यक सेवेतील लोकांव्यतिरिक्त इतर कोणीही घराबाहेर पडू नये, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यांच्या याच आवाहनानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा आणखी एक बळी; राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू

देशातील कोरोना विषाणूबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्या पार्श्वभूमीवर गंभीर उपाय योजण्यास केंद्र आणि राज्य सरकारने सुरुवात केली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्रीपासून राज्याती सर्व ऑफिस, दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केवळ जीवनावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.