पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायकः अमेरिकेत एकाच दिवशी २७०० जणांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. परंतु, अमेरिकेत या विषाणूने अक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका आता अमेरिकेला बसल्याचे जाणवत आहे. अमेरिकेत मृत्यूचा नवा विक्रम नोंदला जात आहे. मागील २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे २७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने ही माहिती दिली आहे.

वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्री अनिल देशमुख

जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोविड-१९ विषाणूमुळे आतापर्यंत ८००००० प्रकरणे समोर आली आहेत. तर ४४८४५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर सोमवार आणि मंगळवारी कोरोनाच्या नवीन ४०००० प्रकरणांची नोंद झाली आहे. 

पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री

जगातील २५ लाख लोक कोरोनाच्या कचाट्यात

या विषाणूमुळे आतापर्यंत जगातील १ लाख ७७ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५.२९ लाखांहून अधिक जण यामुळे संक्रमित झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार जगभरात कोरोना विषाणूमुळे २५,२९,४८१ लोक संक्रमित झाले आहेत. यामुळे १,७४,६५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात यामुळे आतापर्यंत ६,६७,६२४ लोक यातून पूर्णपणे बरेही झाले आहेत. 

अमेरिका सर्वाधिक प्रभावित

लॉकडाऊनमुळे कोरोनाची पहिली लाट काही प्रमाणात रोखली, पण...


अमेरिकेत कोरोनाची सर्वाधिक लागण झाली आहे. सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत. महासत्ता असलेल्या अमेरिकेत आतापर्यंत ८०२१५९ लोकांना याची लागण झाली आहे. तर ४४८४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७२९८५ जण बरे झाले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus death toll in United States 2700 dead in US from coronavirus in last 24 hours