पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाचा वेग मंदावला, मागील १२ तासांत ६२८ नवीन रुग्ण

कोरोना विषाणूबाधित रुग्णावर उपचार सुरु असतानाचे संग्रहित छायाचित्र

भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.

अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आणखी उपाय 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १३ हजार ३८७ वर पोहचला आहे. तर कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून मृतांचा आकडा ४३७ झाला आहे. सध्या ११ हजार २०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार ७४९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

पाच दिवसांत धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पटीनं वाढ

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १९४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार ६९९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ३ हजार २०५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत तर ३०० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केली विशेष रणनीती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus covid19 positive cases 628 and 17 deaths reported in last 12 hours says health ministry