देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाविरोधातील लढाईसाठी अनेक उद्योजक, सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी स्वत:हून पुढे येत मदतीचा हात पुढे केला आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम महाराष्ट्र सरकारच्या मदतीसाठी पुढे धावून आले आहेत.
Welcome the decision of former Union home minister and senior @INCIndia leader Shri @PChidambaram_IN ji of donating Rs.1 crore from his MPLADS fund to Maharashtra CM's #COVIDー19 relief fund.#WarAgainstVirus pic.twitter.com/oi7omRZ6hB
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 30, 2020
कोरोनामुळे देशात लागू होणार आणीबाणी? लष्कराने सांगितले सत्य
पी. चिदंबरम यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटींची मदत केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत चिदंबरम यांचे आभार मानले आहे. पी चिदंबरम यांनी आपल्या खासदार फंडातून महाराष्ट्र सरकारला मदत केली आहे. दरम्यान याआधी, भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटींची मदत केली आहे.
आसारामला कोरोनाची भीती, सुब्रमण्यम स्वामींकडून सुटकेची मागणी
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील जनतेला कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर जाऊ नये, प्रवास टाळा, गर्दी टाळा आणि स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
वीज ग्राहकांना मोठा दिलासा, १ एप्रिलपासून कपातीसह लागू होणार नवे दर