पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

चीनमध्ये कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. या विषाणूमुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चीनमधील हुबेई प्रांतात कोरोना विषाणूमुळे मागील २४ तासांत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्येने २०००चा आकडा पार केला आहे. सरकारच्या मते, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे दगावणाऱ्यांचा आकडा २००४ पर्यंत पोहोचला आहे.

एकूण ७४,१८५ कोरोना विषाणूंची प्रकरणे समोर आली आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) सांगितले की, कोरोना विषाणूमुळे २००४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७४९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात

आयोगाने म्हटले की, ज्या १३६ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १३२ हुबेईमधील हेइलोंगजियांग, शानदोंग, गुआंगदोंग आणि गुईझोऊमध्ये एक-एक व्यक्ती दगावले आहेत. यातील ११८५ नवीन संशयीत प्रकरणे समोर आली. मंगळवारी २३६ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. तर १८२४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.  

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, आयोगाने सांगितले की, ११९७७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि ५२४८ लोक यामुळे पीडित असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १४३७६ संक्रमिक लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर चीनमधील वुहानस्थित वुचांग रुग्णालयाचे संचालक डॉ. लिऊ झिमिंग यांचा कोरोना विषाणूमुळे मंगळवारी मृत्यू झाला होता.

काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान