कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशामध्ये लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणणे शक्य नाही. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत केंद्र सरकारने ही माहिती दिली. केंद्र सरकारने सांगितले की, देशामध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचे संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यावर सध्या आमचे लक्ष आहे. जेणेकरून कोरोनाचा धोका कमी होईल.
'डॉक्टर अन् त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'
बांगलादेशात अडकलेल्या ५८१ भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी करत वकील गौरव बन्सल यांनी याचिका दाखल केली होती. शुक्रवारी न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे अवर सचिव हरविंदर सिंग यांनी उत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे वकील जसमीत सिंह यांनी खंडपीठाला सांगितले की, लॉकडाऊनमुळे बांगलादेश किंवा इतर कोणत्याही देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणे शक्य नाही.
कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती
त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, लॉकडाऊनमुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे. अशामध्ये परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात आणणे शक्य नाही. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना त्याठिकाणीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना त्याठिकाणीच सर्व मदत केली जात आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले ५८१ भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात आडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
हल्ल्यानंतरही ऑन ड्युटीसाठी सज्ज झालेल्या महिला डॉक्टर म्हणाल्या...