पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचे जगभरात १५ लाख रुग्ण; ८८,५०० नागरिकांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

चीनच्या वुहान प्रांतातून झपाट्याने पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूची लागण झालेले जगभरात १५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर जवळपास २०५ देशांमध्ये या विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाने आतापर्यंत ८८ हजार ५०० नागरिकांचा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत सव्वा तीन लाख कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

चीन, इटलीनंतर आता अमेरिकेत या विषाणूने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत दिवसाला २००० कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांमध्ये अमेरिकेत ४००० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सव्वा चार लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत १२ हजार ८४४ नागरिकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

कोविड-१९: जागतिक संकटाच्या परिस्थितीत आम्ही माणूसकी विसरणार नाही

दरम्यान, भारतामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये आतापर्यंत ५ हजार ७३४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत १६६ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर ४७३ नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे आमदार होणार