पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन वगळता जगभरात कोरोनाचे १२,६०० बाधित -WHO

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूच्या फैलामुळे केवळ चीनच नाही तर जगभरातील इतर देशांच्या डोकेदुखीतही वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालानुसार  चीन वगळता इतर देशात कोरोनाचे  १२,६०० बाधित आहेत. 

कोरोनातून बरा झालेल्या पेशंटला पुन्हा या विषाणूची लागण होते का?

चीनच्या बाहेर सुरुवातीला कोरोनाची लागण झालेले २ हजार १०३ रुग्ण होते, मात्र आताच्या घडीला त्यांची संख्या ही १२, ६०० असून ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकूण ७६ देशांत कोरोना बाधित आढळले आहेत. तर चीनच्या बाहेर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही ४८ वरुन २१४ वर पोहोचली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. 

कोरोना बाधित इटलीच्या १४ रुग्णांना मेदांता रुग्णालयात हलवले

तर ९४ हजार लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. चीनव्यतीरिक्त इराण, इटली, जपान, दक्षिण कोरिया या देशांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. एकट्य़ा इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ९२ जण मृत्युमुखी पडले आहेत.